Covid Centre | एकाच अॅंब्युलन्समधून 16जण कोविड सेंटरला, अमरावती जिल्ह्यातल्या शिरसगावमधील घटना
Continues below advertisement
अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या कोरोना विषाणूने चांगलाच जोर पकडलेला आहे. जिल्ह्यातील तिवसा, चांदुर बाजार, अचलपूर, दर्यापूर हे तालुके सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत. आज सकाळी अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यात येत असलेल्या शिरजगाव कसबा येथील 16 नागरिकांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली. या टेस्टमध्ये कोरोना संशयित आढळून आल्याने या सर्व 16 जणांना एकाच रुग्णवाहिकेतून चांदुर बाजारच्या कोविड सेंटरला आणण्यात आल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चांदुर बाजारातील हा धक्कादायक प्रकार पाहून जिल्हा प्रशासनाचे कोरोनाच्या उपचारांप्रती लक्ष नाही का ? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
Continues below advertisement