#Corona सातारा-पुसेगावातील सेवागिरी विद्यालयात सहा विद्यार्थ्यांना कोरोना, शाळा बंद करण्याचा निर्णय
साताऱ्यातील पुसेगावात रयत शिक्षण संस्थेच्या सेवागिरी विद्यालयातील सहा विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाबाधित विद्यार्थ्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यानंतर ही शाळा बंद करण्यात आलीय. सर्व विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक भितीचं वातावरण पसरलंय.