Navy Day Sindhudurg : सिंधुदुर्ग किल्ल्यावर यंदाचा नौदल दिन साजरा होणार : ABP Majha
Continues below advertisement
नौदल दिन यंदा सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा केला जाणार आहे. तर नौदलाची प्रात्यक्षिके जगभरातील पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या निळाशार शांत, सुंदर आणि स्वच्छ अशा तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावर होणार आहेत. देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक केंद्रिय मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्हीं उपमुख्यमंत्री तसेच इतर मंत्री देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत.
Continues below advertisement