Thackeray vs Rane Malvan Statue Collapse : मालवण किल्ल्यावर ठाकरे-राणे गटात राडा Rajkot fort

Shivaji Maharaj statue : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ल्यावरील महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघा आठ महिन्यात कोसळल्यानंतर अवघ्या महाराष्ट्रामध्ये संतप्त भावना पसरल्या आहेत. अवघ्या राज्यभर संतापाची लाट पसरली असल्याने आज (28 ऑगस्ट) महाविकास आघाडीकडून राजकोटमध्ये निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. 

कट्टर विरोधक विजय वडेट्टीवार आणि खासदार नारायण राणे आमने सामने

महाविकास आघाडीमधील नेत्यांसह सत्ताधारी महायुतीमधील नेते सुद्धा पोहोचले आहेत. खासदार नारायण राणे माजी खासदार निलेश राणे यांच्यासह शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी राजकोटवर पोहोचले. या दरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार सुद्धा पोहोचले. त्यामुळे कधीकाळी सहकारी आणि आता कट्टर विरोधक असलेल्या नारायण राणे आणि विजय वडेट्टीवार यांनी  आमने-सामने आल्यानंतर हस्तांदोलन केले. दरम्यान, महाविकास आघाडीकडून मोर्चा आयोजित करण्यात आल्याने माजी खासदार विनायक राऊत यांचे समर्थक सुद्धा राजकोट किल्ल्यावर पोहोचले आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola