Sindhudurg Rice : सततच्या पावसामुळे सिंधुदुर्गातील भातशेती आडवी,बळीराजा संकटात!
Continues below advertisement
सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा ५५,००० हेक्टरवर भाताची लागवड करण्यात आली आहे. यापैकी सुमारे १०,००० हेक्टरवरील हळवी भातशेती आता परिपक्व झाली आहे. मात्र, जिल्ह्यात सततच्या पावसामुळे भात कापणीयोग्य झाला असला तरी शेतकऱ्यांना कापणीला सुरुवात करता येत नाहीये. सततच्या पावसामुळे परिपक्व भातशेती मोठ्या प्रमाणावर आडवी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे भातशेतीला फुटवे येण्याची भीती व्यक्त होत आहे. या परिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. प्रतिनिधी सदाशिव लाड यांनी या परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement