Sindhudurg Narakasura Diwali 2023 : सिंधुदुर्गात 2-3 फुटांपर्यंतच्या नरकासुरांचं दहन
Continues below advertisement
आज नरकचतुर्दशी... सिंधुदुर्गात रात्री ठिकठिकाणी अवाढव्य आणि वेगवेगळ्या तऱ्हेचे नरकासुर पहायला मिळाले. नरकासुर पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी केली होती. नरकासुर बनवताना पर्यावरण पूरक बनवला जातो, जेणेकरून त्यांचं दहन केल्यानंतर प्रदूषण होऊ नये असा संदेश देणारे नरकासुर बनवण्यात आले होते. २ फुटापासून ते ३० फुटापर्यंत अक्राळ विक्राळ रूप असलेले नरकासुर बनवण्यात आले. काही नरकासुर झाडाच्या पानापासून, पेपरच्या रद्दी पासून बनवून प्लास्टिक मुक्तीचा संदेश देण्यात आला. मालवणमध्ये सामाजिक संदेश देणारे नरकासुर बनवण्यात आले. नरकासुराची मध्यरात्री नंतर धिंड काढण्यात आली तर नरकॉचतुर्दशीला म्हणजे आज पहाटे दहन करण्यात आले.
Continues below advertisement