Sindhudurg Mangeli Waterfall : 200 ते 250 फुटांवरुन कोसळणारा, पर्यटकांना भुरळ घालणारा मांगेली धबधबा
Continues below advertisement
महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमेवरून वाहणारा मांगेली धबधबा सध्या पर्यटकांना आकर्षित करतोय. गर्द हिरवीगार वनराईतून कोसळणारा मांगेली धबधबा पर्यटकांना भूरळ घालतो. सिंधुदुर्गाच्या तिलारी खोऱ्यातील मांगेली धबधब्यापर्यंत जाण्यासाठी पर्यटकांना ट्रेकिंग करावी लागते. ट्रेकिंग करत जेव्हा आपण धबधब्याच्या पायथ्याशी पोहोचतो तेव्हा उंचावरून कोसळणारा धबधबा जणू आपलं स्वागत करतो, असा भास होतो. २०० ते २५० फुटांवरून कोसळणार धबधबा पाहताना पर्यटक भान हरपून जातात. अशा या मनमोहक मांगेली धबधब्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सदाशिव लाड यांनी...
Continues below advertisement