Sindhudurg Protest : गावात सर्व्हिस रोड नाही, कुडाळच्या पावशीमध्ये ग्रामस्थांनी रोखला महामार्ग
सिंधुदुर्गच्या कुडाळच्या पावशीमध्ये ग्रामस्थांनी आंदोलन केलंय. गावात सर्व्हिस रोड नसल्यानं जीव मुठीत घेऊन ग्रामस्थांना प्रवास करावा लागतोय. यासाठी ग्रामस्थांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग अडवून आंदोलन केलं. या आंदोलनामुळे महामार्गावरची वाहतूक देखील खोळंबल्याचं पहायला मिळालं.