Sindhudurg Amboli Ghat : पावसाळ्यात सिंधुदुर्गाला पर्यटकांची पसंती,अंबोली घाटात पर्यटकांची गर्दी
वर्षा पर्यटनासाठी प्रसिध्द असलेली आंबोली बहरली असून पर्यटकांचे पाय आंबोली कडे वळू लागले आहेत. त्यामुळे निसर्गाने बहरलेली आंबोली गर्दिनेही बहरू लागली आहे. आंबोलीचा धबधबा अजून प्रवाहित झाला नसला तरी इथल्या डोंगर दऱ्यात उतरणारे कापसासारखे ढग, रिमझिम पाऊस, सर्वत्र पडलेली धुक्याची चादर, अंगाला झोंबणारी थंडी, नजर फिरेल तिकडे प्रसन्न करणारी हिरवीगार वनराई यामुळे पर्यटक आंबोलीत मोठ्या संख्येने यायला लागले आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक आंबोलीत हजेरी लावत आहेत. आंबोलीचा धबधबा सुरू झाला की पर्यटकांच्या संख्येत कमालीची वाढ होणार आहे. त्यामुळे इथल्या व्यावसायिकांसह पर्यटक ही धबधब्याच्या प्रतीक्षेत आहेत. आणखी तीन महिने आंबोली ही अशीच गर्दीसह बहरलेली असणार आहे. सध्या पाऊस नसल्याने धबधबा प्रवाहित झाला नसल्याने पर्यटकांचा मात्र हिरमोड होत आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सदाशिव लाड यांनी..........