Sindhudurga Waterfall : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मधील सावडाव धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित
Continues below advertisement
कोकणात पावसाळा सुरू झाला की निसर्ग आपलं रूप पालटतो. हिरवागार शालू पाघरून निसर्ग नेहमीचं पर्यटकांना आकर्षित करत असतो. मुंबई-गोवा महामार्गापासून जवळच असलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मधील सावडाव धबधबा पूर्ण क्षमतेने वाहू लागला आहे. त्यामुळे पर्यटक या धबधब्याकडे मोठ्या संख्येने येऊ लागले आहेत.
Continues below advertisement