Navy Day 2023 Sindhudurga : राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाजारांच्या पुतळ्याचं मोदींच्या हस्ते अनावरण

भारतीय नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते... छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय नौदलाचे संस्थापक, म्हणून राजकोट किल्ल्यावर महाजारांच्या पुतळ्याचं अनावरण मोदींच्या हस्ते पार पडलं.. त्यानंतर तारकर्लीच्या समूद्रात नौदलाकडून चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली.. पाणबुड्या, तेजस, मिग, चेतकसह विविध एअरक्राफ्टच्या कसरती नौदलाकडून सादर करण्यात आल्या.. विमानवाहू युद्धनौकांपासून ते अन्य युद्धनौका, लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, कमांडो कारवायांचं प्रात्यक्षिक नौैदलाने सादर केलं.. भारतीय नौदलाच्या अपार सामर्थ्याचं दर्शन यावेळी झालं. दरम्यान, नौदलाच्या गणवेशावर लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा झळकणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात केली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola