Malvan Protest : पुतळा अपघातप्ररणी महाविकास आघाडीचा आज मालवणमध्ये मोर्चा

Malvan Protest : पुतळा अपघातप्ररणी महाविकास आघाडीचा आज मालवणमध्ये मोर्चा

मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अपघात प्रकरणी आता महाविकास आघाडीचे नेते मैदानात उतरणार आहेत. मालवणमध्ये महाविकास आघाडीने मोर्चाचं आयोजन केलंय. आदित्य ठाकरे, विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, अंबादास दानवे, भास्कर जाधव, विनायक राऊत हे मोर्चात सहभागी होतील. आज मालवणमध्ये भरड नाका ते मालवण तहसीलदार कार्यालय असा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनाची एवढी घाई का करण्यात आली. तसेच या घटनेशी संबंधित सर्व अधिकारी, कंत्राटदार व इतर यंत्रणेच्या बेजबाबदारीचा जाब या आंदोलनाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना विचारण्यात येणार आहे. यासह पक्षाच्यावतीने सर्व राज्यभरात या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी स्थानिक पातळीवर आंदोलन करण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola