Sindhudurg : बॅंकेतील सत्तांतरानंतर चित्र बदललं ,अध्यक्षांच्या दालनात आता फक्त राणेंचा फोटो

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोठं घमासान झाल्यानंतर सत्तांतर झालं आणि आता बँकेतलं चित्रंही पालटलंय. या निवडणुकीत राणे- ठाकरे वाद रंगला. उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंबाबत नेहमीच आदर दाखवलाय. पण सिंधुदुर्ग बँकेत सत्तांतर होताच जिल्हा बँकेच्या अध्यक्षांच्या दालनातील बाळासाहेब ठाकरेंचा फोटो हटवण्यात आलाय. उद्धव ठाकरेंबरोबर बाळासाहेबांचा फोटो दालनात होता. या फोटोबरोबरच सोनिया गांधी आणि शरद पवार यांचेही फोटो बँकेतून हटवण्यात आलेत आणि आता त्याजागी केवळ नारायण राणे यांचा फोटो लावण्यात आलाय. सत्तांतरानंतर बँकेतील या घडामोडींची चर्चा आता चांगलीच रंगलीय.....

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola