Showik Arrested | सुशांत ड्रग्जप्रकरणी शोविक चक्रवर्ती आणि मिरांडाला 9 सप्टेंबरपर्यंत एनसीबी कोठडी
सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ड्रग्ज कनेक्शनबाबत तपास करत आहे. काल सकाळीच एनसीबीने रिया चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांच्या घरी धाड टाकत घराची झाडाझडती घेतली होती. त्यावेळी रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांना एनसीबीनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. काल रात्री जवळपास 10 वाजता शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा या दोघांना एनसीबीकडून अटक करण्यात आली. शुक्रवारी सकाळी एनसीबीची दोन पथकं शौविकच्या घरी तपासासाठी गेली होती तर सॅम्युअलच्या घरी NDPS अॅक्ट अंतर्गत झडती घेण्यात आली. जवळपास 3 ते 4 तास झडती घेतल्यानंतर दोघांनाही NCB मुंबईतील ऑफिसमध्ये चौकशीसाठी आणण्यात आलं होतं.