Nalasopara मध्ये नायजेरीअन नागरिकाचं  अपहरण करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना : ABP Majha

नालासोपाऱ्यात नायजेरीअन नागरिकाचं  अपहरण करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये.  या अपहरणाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय.  आधी या व्यक्तीला घरात घुसुन मारहाण केली. त्यानंतर त्याचंअपहरण करुन हत्या करण्यात आली. मायकल केचेबाबा असं या मृत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.  अंमली पदार्थाच्या व्यवहारातून ही हत्या झाल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलंय. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणातील आणखी काही आरेपी फरार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola