शिवसेना-काँग्रेसचा अकोला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ,माईकची तोडफोड, मंडपही पाडण्याचा प्रयत्न
Continues below advertisement
अकोला महापालिकेतील सर्वसाधारण सभेतल्या गोंधळाची परंपरा यावेळी कायम राहिलीय. महापालिकेच्या आजच्या सर्वसाधारण सभेत शिवसेना आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी चांगलाच गोंधळ घातलाय. आधीच्या सभेचं इतिव्रूत्त कायम करणे आणि 50 कोटींच्या असमान निधी वाटपावरून हा गोंधळ झालाय. कोरोनामुळे आजची सर्वसाधारण सभा महापालिका सभाग्रूहात न घेता आवारात मंडप टाकून घेण्यात आलीय. या गोंधळात शिवसेना नगरसेवक शशी चोपडे यांनी मंडपचा पाईप ओढत मंडप पाडण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी माईकही तोडण्यात आलाय. सेना नगरसेवक शशी चोपडेंना दोन सभेसाठी निलंबित करण्यात आलंय.
Continues below advertisement