#HathrasCase हाथरस पीडितेच्या न्यायासाठी शिवसैनिक मुंबईच्या रस्त्यावर, घटनेच्या निषेधार्थ आंदोलन
Continues below advertisement
हाथरस बलात्कार प्रकरण योगी सरकारने अत्यंत बेजाबाबदारपणे, अमानवी पद्धतीने हाताळल्याचं दिसत आहे. त्यामुळे या प्रकरणी मुंबईत गुन्हा नोंदवून मुंबई पोलिसांना तपासासाठी यूपीला पाठवावं, अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे. 14 सप्टेंबर रोजी हाथरसमध्ये एका 19 वर्षीय तरुणीवर पाशवी अत्याचार करण्यात आले. आरोपींनी क्रूरतेची परिसीमा गाठत तरुणीची जीभ कापली. एकीकडे पाशवी अत्याचारानंतर तरुणीच्या मृत्यूनंतरही विटंबना सुरुच होती.
Continues below advertisement
Tags :
Hathras Case Updates Hathras News Hathras Hathras Gangrape Case Hathras Rape Hathras Case Shivsena Mumbai