सगळं संपवल्याशिवाय शांत बसणार नाही, शिवेंद्रराजेंची शशिकांत शिंदेंना धमकी, उदयनराजेंनाही टोला
सातारा : साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि कोरेगाव मतदार संघाचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यात सध्या चांगलीच जुंपल्याच पाहायला मिळत आहे. शिवेंद्रराजे भोसले यांनी शशिकांत शिंदे यांना दम देत म्हटलं की, माझी वाट लागली तरी चालेल, माझं सर्व संपलं तरी चालेल पण मी त्याचं सर्व संपवल्याशिवाय शांत राहणार नाही.