Dussehra Melava |मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं राज्याला ऑनलाईन संबोधन,संध्याकाळी शिवसेनेचा दसरा मेळावा!

मुंबई : आज विजयादशमी दसरा. या दिवशी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाकडे लक्ष लागून असते. आज शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. गेल्या अनेक दिवसांचा राहिलेला हिशोब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चुकता करणार आहे. त्यामुळे या मेळाव्यात ठाकरेंच्या भात्यातले बाण कुणाकुणावर चालणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. कारण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेले उद्धव ठाकरे शिवसैनिकांना दसरा मेळाव्याला संबोधणार आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola