Shirdi | आज रात्री पासून शिर्डी आणि पाथरीमध्ये बेमुदत बंद | ABP Majha
या साईबाबांनी आयुष्यभर जात-पात, धर्माच्या भिंती झुगारण्याचा संदेश दिला, त्याच साईबाबांच्या जन्मस्थळाच्या वादावरुन शिर्डी आणि परभणीतल्या पाथरीमध्ये मतभेदाची भिंत उभी राहिलीय. पाथरीला साईबाबांचंच जन्मस्थळ घोषित करण्याला तीव्र विरोध करत शिर्डीत मध्यरात्रीपासून बेमुदत बंद पुकारण्यात आलाय. आज शिर्डीत ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेसाठी शिर्डीलगतच्या ग्रामस्थांनी देखील हजेरी लावली आणि मध्यरात्रीपासून बेमुदत बंद पुकारण्याचा निर्णय एकमुखानं मंजुर केला..पाथरीला निधी देण्यास विरोध नसून, साईबाबांचं जन्मस्थळाचा दर्जा देण्यास विरोध असल्याचं शिर्डीकरांनी स्पष्ट केलंय. तर दुसरीकडे शिर्डीच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी सुरुवातीला पाथरीच्या रहिवाशांनी देखील बंद पुकारला होता.