Shimla Building Collapse | शिमलामध्ये पाच मजली इमारत कोसळली, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
शिमलाच्या भट्टाकुफर येथे पाच मजली इमारत कोसळली. इमारत कोसळतानाचे लाईव दृश्य समोर आले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. काही तासांपूर्वीच इमारत रिकामी करण्यात आली होती. हिमाचल प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इमारत कमकुवत झाली असावी अशी शक्यता आहे. इमारतीवर अनेक ठिकाणी भेगा पडल्या होत्या. स्थानिकांच्या लक्षात आल्यानंतर प्रशासनाने रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवले होते.