Hats Off! 'कोरोनाच्या संकटात दौरे, बैठका घेत असल्याचं अप्रूप' पंकजा मुंडे यांच्याकडून शरद पवारांचं कौतुक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला राम राम ठोकल्यानंतर आता पंकजा मुंडे यांचं एक ट्वीट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत शरद पवारांच कौतुक केलं आहे. पंकजा मुंडे यांनी ट्वीटमध्ये शरद पवारांचा उल्लेख करत त्यांच्याविषयी आदर व्यक्त केला आहे.
आपल्या ट्वीटमध्ये पंकजा मुंडे म्हणाल्या कोरोना च्या परिस्थितीत इतका दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिना चे अप्रूप वाटते. पक्ष ,विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तर कष्ट करणाऱ्यांविषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबानी शिकवले आहे.