Sharad Pawar visits Serum Institute | कोरोनावरील लसीची माहिती घेण्यासाठी शरद पवार यांची सीरम इन्स्टिट्यूटला भेट
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देण्यास गेले. सीरम इन्स्टिट्यूट ऑक्स्फर्डसोबत मिळून कोरोनावरील प्रतिबंधक लस तयार करत आहे. या लसीबाबत जाणून घेण्यासाठी त्यांनी ही भेट दिली. लोकांना परवडणाऱ्या दरात ही लस भारतात उपलब्ध होणार आहे अशी माहिती अदर पुनावाला यांनी दिली.