Sharad Pawar Konkan Tour | शरद पवारांकडून 'निसर्ग' चक्रीवादळानंतरच्या नुकसानीची पाहणी,मदतीचं आश्वासन

Continues below advertisement
रायगड : 'निसर्ग' चक्रीवादळाने कोकणात मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानीच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज रायगडमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. चक्रीवादळामुळे जे नुकसान झालं आहे ते खूप जास्त आहे. यावेळी दुहेरी संकट आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गेल्या अडीच महिन्यापासून व्यवहार ठप्प आहेत, व्यवसाय थांबले आहेत. राज्य सरकारच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे, असं शरद पवारांनी म्हटलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram