Kisan Morcha : शरद पवारांचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, मोर्चात सहभागी होणार

Continues below advertisement

मुंबई : अखिल भारतीय किसान सभेच्या विराट मोर्चानं मुंबईकडे कूच केली आहे. या मोर्चामध्ये ट्रॅक्टर, जीप इत्यादी वाहनांसह हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. 26 जानेवारीला हा मोर्चा राजभवनावर धडकणार आहे. या मोर्चाद्वारे केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यात येणार आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विविध पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. सकाळी 11 वाजता केंद्र सरकारच्या या धोरणाला विरोध केल्यानंतर हा मोर्चा राजभवनाच्या दिशेनं कूच करणार आहे.


मुंबईमध्ये आलेल्या शेतकरी आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देणार आहे. शेतकरी आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा देणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे. अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन कृषी कायद्याविरोधात गेल्या 60 दिवसांपासून दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सबंध महाराष्ट्रातील शेतकरी मुंबई येथे येऊन आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाला आता शरद पवारांनी देखील पाठिंबा दिला आहे.


किसान मार्च भिवंडी दाखल; जेवण करून शेतकरी मुंबईकडे रवाना


दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने नाशिक ते मुंबई वाहन मार्चला सुरुवात करण्यात आली आहे. हा मोर्चा आता भिवंडीत दाखल झाला आहे. दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाचे आता सर्वत्र पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुढील आंदोलन यापेक्षाही चारपट मोठं असेल असा इशारा देखील देण्यात आला आहे तर येणाऱ्या 26 तारखेला जवळपास दहा लाख शेतकरी आंदोलन करणार असल्याचं देखील संघटनेच्या वतीने सांगण्यात आलं आहे.


शेतकऱ्यांचा विराट मोर्चा लवकरचं मुंबईत धडकणार! पाहा निवडक छायाचित्रं


कृषी कायद्याच्या विरोधात नाशिकहुन निघालेला किसान मोर्चा भिवंडीत दाखल झाला असून 10 हजार शेतकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था अमृत वेला संस्थेच्या वतीने करण्यात आली. शेतकरी आता मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.


Kisan Sabha Morcha | किसान सभेचा मोर्चा भिवंडीत दाखल


Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram