Hindi imposition debate | ठाकरे बंधूंच्या हिंदी सक्तीविरोधी भूमिकेचे शरद पवारांकडून स्वागत
हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधूंनी पुकारलेल्या एल्गारचे शरद पवारांनी स्वागत केले. प्राथमिक शिक्षणामध्ये हिंदी सक्तीचा मुद्दा गंभीर असल्याचे मत व्यक्त केले. पाचवी नंतर हिंदी शिकणे अशक्य नसल्याचेही म्हटले. ठाकरे बंधूंच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील मराठीभाषिक एकत्र येत असल्याचे शरद पवारांनी नमूद केले. भाषेच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.