#DhananjayMunde शरद पवार यांनी धनंजय मुंडे प्रकरणी विश्वास नांगरे पाटलांकडून माहिती घेतली
धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. धनंजय मुंडे यांनी याबाबत फेसबुकद्वारे स्पष्टीकरण करताना 'त्या' महिलेचा बलात्काराचा आरोप फेटाळून लावला. परंतु, त्याचवेळी तक्रारदार महिलेच्या बहिणीबरोबर आपले गेल्या 17-18 वर्षांपासून संबंध असून या संबंधातून दोन अपत्यं असल्याचीही कबुलीही त्यांनी स्वतःच दिली आहे. यानंतर भाजपने मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. स्वतः धनंजय मुंडे यांनी बुधवारी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन या प्रकरणाबाबतची वस्तुस्थिती त्यांच्या कानावर घातली.
Tags :
Dhananjay Munde Facebook Post Rape Accuse Crime Vishwas Nangre Patil Dhananjay Munde Rape Case Sharad Pawar