Seatbelts compulsory : सीटबेल्ट संदर्भात आजपासून फक्त समज दिली जाणार : ABP Majha
सुरक्षित प्रवासासाठी मुंबईकरांवर आज मंगळवारपासून वाहतुकीच्या आणखी एका नियमाची सक्ती करण्यात येणार आहे. चारचाकी वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला आता सीटबेल्ट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, या नियमाचे पालन न करणाऱ्यांवर मंगळवारपासून दंडात्मक कारवाई न करता केवळ वाहतूक पोलिसांकडून कडक समज' देण्यात येणार आहे. तर सीटबेल्ट सक्तीबाबत दंडात्मक कारवाई ११ नोव्हेंबरपासून सुरु करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांनी दिलेत...