School College Reopen | MMR परिसरातील शाळा, महाविद्यालयं 22 फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा प्रस्ताव
2020 च्या मार्च महिन्यापासून कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा आणि महाविद्यालयं तब्बल दहा महिन्यांनंतर आता पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा सुरू आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने हे पाऊल सरकार उचलतंय. शाळा-कॉलेजचे दरवाजे ऐन परीक्षांच्या तोंडावर उघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या 22 फेब्रुवारीपासून एमएमआर विभागातील शैक्षणिक संस्था सुरू होण्यासंदर्भात प्रस्ताव केला गेला आहे, असे सूतोवाच मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत.
Tags :
School To Reopen Lockdown Gudidelines College Reopen Mumbai School School Reopen India Lockdown Ajit Pawar Coronavirus Covid 19