Mumbai School Teachers मुंबईतील सर्व शिक्षकांना 30जूनपर्यंत वर्क फ्रॉम होम! शिक्षणाधिकाऱ्यांची सूचना
Continues below advertisement
मुंबई महापालिका अंतर्गत येणाऱ्या शिक्षकांमध्ये 15 जून पासून शैक्षणिक वर्ष सुरू तर झालं, मात्र शाळांमध्ये यायचं की नाही याविषयी संभ्रम होता. मात्र हा संभ्रम आता दूर झाला असून 30 जूनपर्यंत शिक्षकांनी वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना मुंबई महापालिका शिक्षण अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. मुंबई महानगर क्षेत्रात अनेक कंटेन्मेंट झोन्स येत असल्याने तसेच मुंबई जिल्हा अद्यापही रेड झोनमध्येच असल्यामुळे शाळा सुरू होण्याबाबत अद्याप निश्चित तारीख ठरलेली नाही. याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्त यांनी योग्यवेळी योग्य परिस्थिती पाहून घेण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये आहेत.
Continues below advertisement