Satara मध्ये दोन गट आपपसांत भिडले, दोघांचा मृत्यू 15 जण जखमी : ABP Majha
साताऱ्यातील पुसेसावळी येथे काल दोन गट आपापसांत भिडले होते. यात दोघांचा मृत्यू झालाय तर १५ जण जखमी आहेत. शिवाय दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. सोशल मीडियातील पोस्टवरून दोन गट भिडल्याची माहिती मिळतेय. या घटनेनंतर त्यानंतर अनेक वाहने पेटवण्यात, शिवाय प्रार्थनास्थळांचीही जाळपोळ करण्यात आलीय. त्यामुळे प्रचंड तणाव आहे. दरम्यान, तातडीचा उपाय म्हणून जमावबंदी आदेश लागू करण्यात आलाय. शिवाय खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी इंटरनेट सेवा बंद केलीय. दरम्यान, पुसेसावळीतील घटनेनंतर सातारा शहरातही तणाव निर्माण झालाय.