Satara Women : माण तालुक्यातील महिलेला अमानुष मारहाण, चार जणांना अटक : ABP Majha
Continues below advertisement
साताराच्या माण तालुक्यात एका महिलेला चार जणांनी अमानुष मारहाण केली. माणमधील पानवण गावातली ही घटना आहे. गुरांना चारा घेण्यासाठी दिलेले पैसे परत मागितल्याचा राग मनात धरून या चार नराधमांनी महिलेला भर चौकात उसानं आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसंच धारदार शस्त्रानं वारही केले. चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे. देवदास नरळे, पिंटू नरळे, संतोष नरळे, जनाप्पा शिंदे अशी आरोपींची नावं आहेत. पीडित महिला गंभीर जखमी झाली असून, तिला म्हसवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले आहे
Continues below advertisement