Satara Vai Bagad Yatra : साताऱ्याच्या वाईमध्ये बगाड यात्रा, लाखो भाविकांची गर्दी

Continues below advertisement

Satara Vai Bagad Yatra : साताऱ्याच्या वाईमध्ये बगाड यात्रा, लाखो भाविकांची गर्दी

महाराष्ट्राला खुणावणारी बावधनची सुप्रसिद्ध 'बगाड यात्रा माघ पौर्णिमेला बावधनमध्ये एक वेगळाच उत्साह पाहण्यास मिळतो. कारण या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या बगाड यात्रेचा प्रारंभ होतो. यादिवशी धनगर बांधवांकडून काशिनाथाच्या चरणी मानाची घोंगडी अर्पण करतात. त्याचप्रमाणे गावकरी बगाडाच्या शिडासाठी लागणारे कळक तोडतात. यावेळी अबालवृद्ध कळक ओढण्यासाठी उपस्थित असतात. बावधन गावच्या बगाडासाठी वाघल्यासाठी लागणारी बाभळ चौधरवाडी गावातून आणली आहे. चौधरवाडी गावातील आबासो मारुती पिसाळ यांनी ही बाभळ आनंदाने नाथ साहेबांच्या चरणी अर्पण केली आहे. हे जरी चौधरवाडीत राहण्यास असले तरी त्यांचं मूळ गाव हे बावधन आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram