Satara News : साताऱ्यात धान्यात टाकणाऱ्या पावडरच्या वासानं चिमुकल्या भाऊ-बहिणीचा मृत्यू
Maharashtra Satara News : सातारा : मच्छर मारण्याचं औषध तोंडात गेल्याने नागपुरात दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना साताऱ्यातील एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. धान्याची साठवणूक करत असताना त्यात टाकल्या जाणाऱ्या पावडरीच्या उग्र वासाने दोन चिमुकल्या भावा-बहिणीचा मृत्यू झाला आहे. साताऱ्यातल्या (Satara) कराड तालुक्यातील मुंडे येथील दोन चिमुकल्या भावा-बहिणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.