Satara : शिवजयंतीनिमित्त अजिंक्यतारा किल्ल्यावर मशाल महोत्सव, शेकडो शिवभक्त उपस्थित
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात साजरी केली जात असताना आता साताऱ्यातील शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शहरातील अजिंक्यतारा किल्ल्यावर मशाल महोत्सव साजरा करण्यात आला. या मशाल महोत्सवाची पहिली मशाल सातारचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते पेटवण्यात आली. ढोल-ताशांचा कडकडाट आणि तुतारीचा निनाद यामध्ये संपूर्ण अजिंक्यतारा परिसर हा दुमदुमून निघाला होता. या मशाल महोत्सवाला शेकडो शिवभक्तांनी हजेरी लावली. गडावरचा हा सगळ्या माहुल खास एबीपी माझा च्या प्रेक्षकांसाठी
Tags :
Satara Chhatrapati Shivaji Maharaj Shivaji Maharaj Shivjayanti Shiv Jayanti 2023 Ajinkyatara Fort Torna Fort