Satara Rain Update : सातारा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट, पाचगणमधील रस्ते जलमय : ABP Majha
साताऱ्याच्या अंबेनळी घाटातील चिरेखिंड गावाजवळ दरड कोसळलीय. काल दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे दरड कोसळलीय. त्यामुळे घाट वाहतुकीसाठी पूर्ण बंद करण्यात आलाय. घाटात काही स्थानिक आणि पर्यटक अडकल्याची माहिती आहे. साताऱ्यातील जोर गावात यंदा सर्वात जास्त पाऊस पडलाय. मागील 21 तासांत 244 मिमी पावसाची नोंद करण्यात आलीय.