Satara Murder : साताऱ्यात दोन जणांची गोळ्या घालून हत्या, एक आरोपी ताब्यात ABP Majha
Continues below advertisement
साताऱ्यातील पाटण तालुक्यात दोन जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.. पाटण तालुक्यातील धावडे गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.. श्रीरंग जाधव आणि सतिश जाधव अशी मृतांची नावं आहेत.. तर मदन कदम असं आरोपीचं नाव आहे, त्याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं.. आरोपी मदनचं धावडेचं गावात फार्महाऊस आहे.. घडलेल्या गुन्ह्याचा या फार्महाऊसशी काही संबंध आहे का, या अंगानंही पोलिस तपास करत आहेत. दोन खून झाल्याचं कळताच साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले..
Continues below advertisement