Satara : कुत्र्याची शिकार करताना बिबट्या शिरला घरात, ग्रामस्थ भयभीत ABP Majha
Continues below advertisement
साताऱ्याच्या कोयना हेळवाक गावातील घरात शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलंय.. 5 तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला पिंजऱ्यात कैद करण्यात वनविभागाला यश आलंय.. कुत्र्याची शिकार करण्याच्या प्रयत्नात बिबट्या एका घरात शिरला.. घरमालक सुधीर कारंडे यांनी लगेचच घर बंद करुन वनविभागाला याबाबत माहिती दिली.. त्यानंतर वनविभाग घटनास्थळी दाखल झालं आणि बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरु केले. अखेर पाच तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला कैद करण्यात यश आलं.. बिबट्या कैद झाल्याने अखेर ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.. बिबट्यावर प्राथमिक उपचार करुन त्याला पुन्हा एकदा जंगलात सोडून देण्यात येणार आहे...
Continues below advertisement