Satara Kaas Pathar Dam : साताऱ्याच्या कास धरणाकडे पर्यटकांची पाठ, पावसाच्या हलक्या सरी
साताऱ्याला पाणी पुरवठा करणारे कास धरण यंदा भरलेलं नाही. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यावर धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागतं. या कास धरण परिसरात सध्या म्हणावा तसा पाऊस पडलेला नसल्यानं धरणानं तळ गाठलाय. मात्र, काही दिवसात हे कास धरण पुर्ण क्षमतेने भरेल अशी आशा व्यक्त केली जातेय. धरण न भरल्यानं कास धरणाकडे पर्यटकांनी पाठ फिरवल्याचं पाहायला मिळतंय