Satara : उद्या साताऱ्यात लंडनहून आणलेल्या वाघनखांसह शस्त्रांचं प्रदर्शन

Continues below advertisement

लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयातून आलेली वाघनखं साताऱ्यातील राज्य वस्तू संग्रहालयात पोहचली आहेत. लंडनहून ही वाघनखं मुंबईत पोहचली. त्यानंतर कडक सुरक्षा व्यवस्थेत ही वाघनखं साताऱ्यामध्ये पोहचली. उद्या या वाघनखांसह शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं जाणार आहे. यावेळी छत्रपती घराण्याचे वंशज उदयनराजे, शिवेंद्रराजे, संभाजीराजे उपस्थित राहणार आहेत. 

वाघनखं भारतात आणण्यासाठी किती झाला खर्च?

वाघ नख भारतात आणण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात आल्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यावर आपल्या अधिवेशनाचा एका दिवसाचा खर्च जेवढा आहे त्याच्या कितीतरी पट कमी खर्च झाला असल्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. 

वाघनखं आणण्यासाठी जाण्याचा आणि येण्याचा 14 लाख 8 हजार रुपये खर्च झाला असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले.

लंडनहून आणली जाणारी वाघनखं शिवरायांची नाहीत?

लंडनहून आणली जाणारी वाघनखं (Wagh Nakh)  ही शिवरायांची (Chhatrapati Shivaji Maharaj) नाहीत असा दावा इतिहासकार इंद्रजीत सावंत गेल्या अनेक महिन्यांपासून करत होते.  त्यांच्या या दाव्याला लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमनंही पुष्टी दिल्याचं त्यांचं म्हणणं आहे.. ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत यासाठी कोणताही पुरावा नाही असं पत्र या म्युझियमनं इंद्रजित सावंतांना पाठवल्याचं त्यांनी म्हटलंय.. स्वतः इंद्रजित सावंतांनी ८ जुलै राेजी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram