MBBS EXAM : एमबीबीएस प्रवेशाच्या नावानं 65 कोटींची माया जमवली, ईडीकडून आरोपपत्र दाखल : ABP Majjha

Continues below advertisement

सातारा जिल्ह्यातील मायणी इथल्या वैद्यकीय महाविद्यालयाचे अध्यक्ष महादेव देशमुख यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने एमबीबीएस प्रवेश घोटाळा केल्याचा आरोप ईडीने केलाय. जवळपास साडेतीनशे विद्यार्थ्यांची फसवणूक करत ६५ कोटींची माया जमवल्याचा आरोप ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात करण्यात आलाय. श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ॲण्ड रिसर्च सेंटरमध्ये एमबीबीएसच्या अभ्यासक्रमांना प्रवेश दिले जात होते. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचीही परवानगी घेण्यात आली नव्हती. विद्यार्थ्यांकडून पैसे घेण्यात आले. मात्र, त्यांना प्रवेश देण्यात आले नाहीत किंवा त्यांचे पैसेही परत देण्यात आलेले नाहीत असा आरोप करण्यात आलाय..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram