Satara Mandhardevi Yatra : मांढरदेवी गडावरील काळुबाईची यात्रा यंदा रद्द

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील प्रचलित असलेल्या मांढरदेवी गडावरील काळुबाईची यात्रा यंदा रद्द करण्यात आली असून 13 जानेवारी ते 13 फेबुवारी पर्यंत मंदिरही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या पाश्वभुमीवर प्रशासकिय यंत्रणेकडून काळजी घेतली जात असताना आज सातारा जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.


यात्रेदरम्यान देवस्थानचे ट्रस्टी, मंदिर पुजारी व ग्रामस्थ अशा मोजक्याच भाविकांनी मंदिराचे पुजन करण्याच्या या बैठकित प्रशाकिय यंत्रणेकडून सुचना देण्यात आल्या आहेत. साता-यातील मांढरदेव गडावरील काळुबाई देवीची यात्रा मोठी प्रचलित आहे. या यात्रेला महाराष्ट्रासह इतर राज्यातील लाखो भाविक गडावर देवीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार गडावर सुमारे 8 लाख भाविकांनी हजेरी लावली होती.


जानेवारी महिन्यात पौष पौर्णिमेला या देवीची यात्रा भरते. 27,28 आणि 29 जानेवारीला या देवीची मुख्य यात्रा गडावर भरते. मात्र किमान एक महिनातरी या गडावर देवीच्या भक्तांची मोठी रेलचेल असते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola