Shivendra Raje : मर्जीतील लोकांना टेंडर मिळावीत म्हणून कामं अडवली, शिवेंद्रराजेंची उदयनराजेंवर टीका
सातारच्या विकास कामांसाठी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले दोन्ही राजेमध्ये आता विकास निधी वरून रस्सीखेच सुरू आहे. सातारच्या विकास कामांसाठी राज्याकडून जास्त निधी आला असून केंद्राकडून खासदार उदयनराजेंना भरीव निधी आणता आला नसल्याची टीका आमदार शिवेंद्रजींनी केलीय.विकास कामातील टेंडर आपल्या मर्जीतल्या लोकांना मिळावे म्हणून उदयनराजेंनी काम अडवली असल्याचा आरोप देखील यावेळी शिवेंद्रराजांनी केलाय.डिसेंबर मध्ये झालेल्या अधिवेशनातून आणि डीपीडीसी कडून आम्हाला निधी मिळाला असून केंद्राकडून मंजूर झालेले एक तरी योजना उदयनराजेंनी दाखवावी असं थेट सवाल शिवेंद्रराजांनी उपस्थित केला आहे.