Mandhardevi Gad : Kalubai Temple : मांढरदेवी गडावरील काळूबाई मंदिरात चोरीची घटना CCTVत कैद
महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मांढरदेवी गडावरील काळूबाईच्या मंदिरात चोरीची घटना घडलीए... मंदिरातील दानपेटी फोडून त्यात चोरी करण्याचा प्रयत्न पहाटे चोरट्याने केला. चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला असून आपण ओळखले जाऊ नये.. म्हणून चोरट्याने तोंडाला आणि अंगाला काळे कापड गुंडाळले होते. बाबत सध्या ग्रामस्थांकडून निषेध व्यक्त केला जात आहे.. आज्ञातावर वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.