Kaas Pathar Satara : कास पठारावर पर्यटनासाठी E BUS धावणार,पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम
जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ असलेल्या सातारा जिह्यातील कास पठारावरील पर्यटन आता प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक होणार आहे. कास पठारासाठी मंत्रालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात चार इलेक्ट्रिक बसेसचे तसेच बायोटॉयलेट सुविधेचे लोकार्पण करण्यात आलंय. मंत्रालयातून पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते व्हीसीद्वारे ई-बसेसचा शुभारंभ करण्यात आला. कास पठारावर पर्यटनाला चालना देण्यासाठी वॉक वे तसेच दर्शन गॅलरी सुरू करण्यात येणार आहे.