Eknath Shinde Satara : एकनाथ शिंदे दरे गावात, महायुतीची बैठक कधी होणार?

Continues below advertisement

Eknath Shinde Satara : एकनाथ शिंदे दरे गावात, महायुतीची बैठक कधी होणार? 

राज्यातील विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळवल्यानंतर महायुती विनासायास सत्तास्थापन करेल, असा अंदाज होता. मात्र, त्यानंतर महाराष्ट्रात सुरु झालेल्या राजकीय नाट्यामुळे महायुतीचा शपथविधी लांबणीवर पडला आहे. आता महायुतीचा शपथविधी 5 डिसेंबरला होईल, असे सांगितले जात असले तरी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची नाराजी आणि मौन पाहता 5 डिसेंबरला तरी महायुतीचा शपथविधी (Mahayuti Oath Taking Ceremony) पार पडेल की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. या सगळ्यामुळे महायुती विशेषत: भाजपच्या गोटातील अस्वस्थता वाढली आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काळजीवाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एखादा मोठा निर्णय घेऊ शकतात, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी संध्याकाळी वर्षा बंगल्यावर निवडक नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यानंतर ते दरे गावाकडे रवाना झाले. याबाबात बोलताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी एक सूचक वक्तव्य केले. त्यांनी म्हटले की, एकनाथ शिंदे यांच्यासमोर राजकीय पेचप्रसंग येतो तेव्हा, त्यांना जेव्हा वाटलं की आपल्याला विचार करायला वेळ हवा आहे, तेव्हा ते आपल्या गावी जातात. दरे गावात त्यांचा मोबाईल लागत नाही. तिकडे ते आरामात निर्णय घेतात. जेव्हा एखादा मोठा निर्णय घ्यायचा असतो, तेव्हा ते नेहमी दरे गावात जातात. आता ते गावी गेले आहेत, कदाचित उद्या संध्याकाळपर्यंत ते एखादा मोठा निर्णय घेऊ शकतात. राज्यात जी राजकीय उलथापालथ सुरु आहे, त्याबाबत ते निर्णय घेतील, असे संजय शिरसाट यांनी सांगितले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram