Congress Protest Satara : कोल्हापूर , साताऱ्यात खड्ड्यांविरोधात काँग्रेसचं आंदोलन

Congress Protest Satara : कोल्हापूर , साताऱ्यात खड्ड्यांविरोधात काँग्रेसचं आंदोलन 

हेही वाचा : मुंबई पोलीस दलातून निलंबीत केलेले अधिकारी सचिन वाझे (Sachin vaze) याने महाराष्ट्राच्या  राजकारण ढवळून निघेल असा  बॉम्ब टाकला. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)  यांच्यावर सचिन वाझे याने गंभीर आरोप केले. सचिन वाझेने आरोप केल्यानंतर  तासाभरातच अनिल देशमुखांनी  पत्रकार परिषद घेत सचिन वाझेचे सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच सचिन वाझे हा गुन्हेगार आहे. ही व्यक्ती विश्वास ठेवण्यालायक नाही असं हायकोर्टाने म्हटल्याचा दाखला देखील त्यांनी या वेळी दिला. ते नागपुरात बोलत होते.   अनिल देशमुख म्हणाले,  सचिन वाझे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे.  मुंबई उच्च न्यायालयाने देखील  वाझेबद्दल बोलताना वाझे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे, असे म्हटले होते.  दोन खुनाचा त्यांच्यावर गुन्हा आहे. त्यामुळे सचिन वाझेच्या वक्तव्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असं देखील हायकोर्ट म्हणाले होते. सचिन वाझे याला हाताशी धरुन फडणवीस माझ्यावर आरोप करत आहेत.  अनिल देशमुखांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर पलटवार  सचिन वाझेच्या आरोपानंतर  अनिल देशमुखांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरच पलटवार केला आहे. अनिल देशमुख म्हणाले, चार पाच दिवसांपूर्वी मी फडणवीस यांच्यावर आरोप केले होते. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी कशा पद्धतीने प्रतिज्ञापत्र पाठवले होते. मी केलेल्या   त्या आरोपानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे याला हाताशी धरुन माझ्यावर आरोप केला आहे. परंतु देवेंद्र फडणवीस यांना मुंबई उच्च न्यायालयाने काय म्हटले ते माहीत नाही का? (सचिन वाझे) गुन्हेगारी स्वरुपाची पार्श्वभूमी आहे. यामुळे त्याच्या वक्तव्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असे कोर्टाने म्हटले आहे. परंतु त्याला हाताशी धरुन माझ्यावर आरोप लावत आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola