यवतमाळमध्ये संतोष ढवळेंकडून पीक विमा मॅनेजरच्या अंगावर सोयाबीन फेकून मारहाण,शिवसेनेचं जवाब दो आंदोलन
यवतमाळ जिल्ह्यातील अतिवृष्टी ने मोठं नुकसान झाले आहे आणि अशानैसर्गिक आपत्ती काळात शेतकऱ्यांना थोडी मदत व्हावी म्हणून शेतकरी पीक विमा काढतात त्याच अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यातील 4 लाख 67 हजार 21 शेतकऱ्यांनी पीकविमा काढल्यानंतर केवळ 9 हजार 776 शेतकऱ्यांनाच पीक विमा नुकसान भरपाई
विमा कंपनी कडून शेतकऱ्यांना देण्यात आली आणि जिल्ह्यातील लाखो शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा पासून वंचित राहिले खरे तर विमा कंपनीला यात 158 कोटी रुपये मिळाले मात्र ती विमा कंपनीने उर्वरित शेतकऱ्यांना पीक विमा पासून वंचित ठेवले असा आरोप खासदार भावना गवळी यांनी करीत विमा कंपनी विरोधात आज जबाब दो आंदोलन पुकारले.
Tags :
Santosh Dhawale Bhavna Gavli Soyabeen Santosh Dhavle Soybean Shivsena Protest Crop Insurance Yavatmal Shivsena Farmer Protest