“सध्याच्या स्थितीतही पंतप्रधानांना शांत झोप लागत असेल तर त्यांचे कौतुक करायला हवं” - संजय राऊत

मुंबई : शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सामनाच्या 'रोखठोक' सदरातून राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. देशात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवरून संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना म्हटलं आहे की, या स्थितीत आपल्या पंतप्रधानांना शांत झोप लागत असेल तर त्यांचे कौतुक करायला हवे. त्यांनी म्हटलंय की, नवीन वर्षात कोणती फळे मिळतील त्याचा भरवसा नाही. लोकांनी एकच करावे, आपले कुटुंब कसे वाचवता येईल ते पाहावे. बाकी देश सांभाळायला मोदी व त्यांचे दोन-चार लोक आहेत, अशी टीका राऊत यांनी केली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola