#RahulGandhi Arrest शोषित समाजातील मुलीचा आवाज दाबण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारची दडपशाही : संजय राऊत
Continues below advertisement
उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील सामूहिक अत्याचार प्रकरणातील 19 वर्षीय पीडितेचा मंगळवारी सकाळी दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. मृत्यूनंतर पीडितेचं अंत्यसंस्कार तिच्या परिवाराचं म्हणणं न ऐकता पोलिसांनीच केले असल्याचा आरोप नातेवाईकांनी केले. तसंच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर करत सरकारवर आरोप केले आहेत. हाथरसमधील अत्याचार पीडितेच्या मृत्यूनंतर देशभरात अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात असून आरोपींना कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे. हाथरस प्रकरणी SIT कडून चौकशी सुरु केली आहे. एसआयटीनं पीडित परिवाराची भेट घेतली आहे. सात दिवसात एसआयटीला रिपोर्ट सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Continues below advertisement
Tags :
Rahul Gandhi Pushed Hathras Case Updates Hathras News Rahul Gandhi Hathras Gangrape Case Hathras Hathras Case